Gold and silver prices rise despite the recession 
अर्थविश्व

सोने-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर

नामदेव कुंभार

Gold Rate Today : हवामानाच्या बदलाप्रमाणेच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये बदल झाला आहे. सोन्याच्या भावांमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत होती. मात्र, बुधवारी सोन्याच्या किंमतीम्ये साधारण वाढ झाली आहे. चांदीच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत होते. बुधवारी सोनं पुन्हा महागलं आहे. सोने अथवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दर जाणून घ्या.....

बुधवारी 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 170 रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सोनं 800 रुपयांनी स्वस्त झालं होतं. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरांमध्येही वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवारी चांदीची किंमत प्रति किलो 700 रुपयांनी वाढली होती. मंगळवारी चांदी प्रति किलो 600 रुपयांनी स्वस्त झाली होती.

मुंबईमध्ये प्रतितोळा 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत 46 हजार 680 रुपये तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 48 हजार 680 रुपये झालं आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रति तोळा 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत 48 हजार 050 रुपये तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 52 हजार 420 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यानंद बापटांपूर्वी नारायण पेठेतील ‘PIL मॅन’ DJ विरोधात लढला होता! सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला लढा

पाकडे जगासमोर उघडे! Imam-Ul-Haq वर दोन वर्षांच्या बंदीची तलवार, तर मोहम्मद रिझवानची कारकीर्द संकटात; नेमका काय केलाय कांड?

Mumbai News: मुंबईच्या मतदार यादीचे 'क्लिनिंग'! तीस लाखांहून अधिक नावे वगळली, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Marathi News Live Updates : प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 22 कॅरेट, 18 कॅरेट अन् 24 कॅरेट सोनं कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT