gold rate  esakal
अर्थविश्व

Gold Price : युक्रेन-रशिया युद्धादरम्यान काय आहे सोन्याचा भाव? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिणे खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होत होते. सोन्याचा भाव सध्या 5500 रुपये स्वस्त झाला आहे. सोने 50600 रुपये आणि चांदी 65000 रुपयांच्या आसपास विकली जात आहे.

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने, चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्यासह चांदी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने पुन्हा एकदा ५० हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. (Check Today's Gold Price Updates)

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Coला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT