Check Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय! जाणून घ्या आजची किंमत

सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या व्यापारी आठवड्यात सोने तसेच चांदीच्या भावात (Gold Silver Price) किरकोळ घसरण झाली. देशात सोन्याचा भाव 50 हजार रुपये तर चांदीचा भाव 64 हजार रुपयांच्या जवळपास गेला आहे. (Today's Gold Silver Price Updates)

बुधवारी सोने 82 रुपये प्रति दहा ग्रॅमवर कमी होऊन 50,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. याआधी मंगळवारी सोनं 50,131 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. त्याचबरोबर चांदीचा भाव 169 रुपयांनी घसरून 64,203 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी मंगळवारी चांदी 64,372 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव

बुधवारी 24 कॅरेट सोने 82 रुपयांनी स्वस्त होऊन 50049 रुपये, 23 कॅरेट सोने 81 रुपयांनी स्वस्त होऊन 49849 रुपये, 22 कॅरेट सोने 75 ते 45 हजार 845 रुपये, 18 कॅरेट सोने 61 रुपयांनी स्वस्त होऊन 37 हजार 537 रुपये आणि 14 कॅरेट सोने 48 रुपयांनी स्वस्त होऊन 29 हजार 279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Coला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT