Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोनं आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price Today: सोने चांदीच्या दरातील घसरण सुरुच आहे. त्यामुळे तुम्हीदेखील सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कालच्या दिवसाच्या घसरणीचा ट्रेंड नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारीही कायम राहिला. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरून 51,954 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला, तर चांदी 0.27 टक्क्यांनी घसरली. यानंतर चांदीचा भाव 67,306 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT