Gold Silver Price Sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोनं अन् चांदी स्वस्त; दागिने खरेदी करण्यासाठी योग्य संधी

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price Updates: जर तुम्हाला सोने आणि चांदीची खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. तुम्हाला सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी घसरून 51,510 रुपये प्रति तोळा झाला आहे, तर चांदीच्या किमतीत 1.10 टक्क्यांनी घट झाली आहे. यानंतर चांदीचा भाव 66,667 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT