Check Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सोनं खरेदीसाठी योग्य वेळ आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सोनं खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. देशात आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,150 आहे, जी कालच्या दिवशी 49,850 होती. म्हणजेच सोन्यामध्ये प्रतितोळा 700 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 53,620 रुपये आहे. काल ही किंमत 54,380 रुपये होती. म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 760 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या दरात मोठी घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 68,300 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 70,000 होती. म्हणजेच चांदीच्या दरात प्रतिकिलो 1700 रुपयांची घट झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT