gold price google
अर्थविश्व

सणवारांच्या दिवसात सोनं महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सणांच्या महिन्यात सोने चांदी खरेदी करण्याकडे कल जास्त असणार आहे त्यामुळे आता सोने चांदीचे दर आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली होती. त्यानंतर सातत्याने सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली मात्र आज सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. सणांच्या महिन्यात सोने चांदी खरेदी करण्याकडे कल जास्त असणार आहे त्यामुळे आता सोने चांदीचे दर आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. (gold silver price update on nagpanchami 5 august 2022)

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,820 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 577 रुपये आहे

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,640 रुपये

दिल्ली - 51,980 रुपये

हैदराबाद - 51,820 रुपये

कोलकत्ता - 51,820 रुपये

लखनऊ - 51,980 रुपये

मुंबई - 51,820 रुपये

नागपूर - 51,580 रुपये

पूणे - 51,580 रुपये

देशात येणार 'वन गोल्ड वन रेट' योजना

देशात 'वन गोल्ड वन रेट' योजना लागू करण्याची मागणीला जोर धरलाय कारण हेच सोने दिल्लीत दुसऱ्या दराने विकले जाते, नंतर पटण्यात दुसऱ्या दराने. तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत मोठी तफावत दिसेल.

सोने तेच आहे आणि सोन्याची शुद्धताही तीच आहे. कारण बंदरातून सोने आयात करुन उतरवले जाते, तेथून वेगवेगळ्या राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात 'वन गोल्ड वन रेट' येण्याच्या हालचाली सुरू आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT