gold silver update
gold silver update sakal
अर्थविश्व

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

लग्नसराईच्या सीजनमध्ये सोने चांदीच्या किमतीत चढ- उतार दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज सलग तिसऱ्या दिवशीही घसरलाय. आज सोन्याच्या दरात १० ग्रॅम सोन्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे.

आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४७,६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१,९८० रूपये आहे तर चांदीच्या दरात थोडी घसरण झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१५ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - ५१९८० रुपये

दिल्ली - ५१९८० रुपये

हैदराबाद - ५१९८० रुपये

कोलकत्ता - ५१९८० रुपये

लखनऊ - ५२,१३० रुपये

मुंबई - ५१,९७० रुपये

नागपूर - ५२,०२० रुपये

पूणे - ५२,०२० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT