Sovereign Gold Bond Sakal
अर्थविश्व

‘सुवर्ण’संधी : सॉव्हरिन गोल्ड बाँड

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’मध्ये गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी आजपासून (ता. ९ ऑगस्ट) पुन्हा उपलब्ध होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’मध्ये गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी आजपासून (ता. ९ ऑगस्ट) पुन्हा उपलब्ध होत आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पाचवी मालिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे चौथ्या मालिकेपेक्षा थोड्या कमी किमतीत हे सुवर्ण रोखे खरेदी करता येणार आहेत. हे रोखे स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता, इतर सर्व शेड्यूल कमर्शिअल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक टपाल कार्यालये; तसेच विविध ब्रोकिंग कंपन्यांच्या मार्फत खरेदी करता येतात.

  • इश्‍यू सुरू होण्याची तारीख - ९ ऑगस्ट २०२१

  • इश्यू बंद होण्याची तारीख - १३ ऑगस्ट २०२१

  • किमान गुंतवणूक - एक ग्रॅम

  • कमाल गुंतवणूक - चार किलो

  • प्रतिग्रॅम किंमत - रु. ४७९०

  • डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत - रु. ४७४०

  • सुवर्ण रोख्यांचा कालावधी - ८ वर्षे

  • इश्‍यू किमतीवर वार्षिक व्याज - २.५० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

अग्रलेख - विवेकी स्वर लोपला

आजचे राशिभविष्य - 09 जानेवारी 2026

Egg Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी हेल्दी काहीतरी खास हवंय? 15 मिनिटांत तयार होणारा ‘अंडा पराठा’ ट्राय करा

३० लाख लाडक्या बहिणी चिंतेत! ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता लाभ बंद होणार; १ एप्रिलपासून ‘या’ लाडक्या बहिणींनाच दरमहा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT