Online-Store
Online-Store 
अर्थविश्व

ई कॉमर्स क्षेत्राला ‘अच्छे दिन’

यूएनआय

नवी दिल्ली - भारतातील ई कॉमर्स व्यवसायाची दरवर्षी २७ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल ९९ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’ने वर्तविला आहे. तसेच, या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मक्तेदारी निर्माण होऊन ते फेसबुकच्या साह्याने ऑनलाइन किराणा माल व्यवसायात निम्मा वाटा त्यांचा असेल, असेही या संस्थेने म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे ई कॉमर्सची चांगलीच भरभराट झाली असून अनेक नवे ग्राहक निर्माण झाले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिल्याने तीन वर्षांत अपेक्षित असलेली वाढ तीनच महिन्यात साधली गेली आहे. यामुळे २७ टक्के इतक्या प्रचंड वेगाने वाढ होऊन २०२४ पर्यंत एकूण उलाढाल ९९ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल आणि यामध्ये किराणा माल आणि फॅशनेबल वस्तू यांचा मोठा वाटा असेल, असे ‘गोल्डमन सॅक्स’ने म्हटले आहे. 

रिलायन्स- व्हॉट्‌सॲप भागीदारी
रिलायन्सने ऑनलाइन किराणा विक्रीसाठी फेसबुकबरोबर भागीदारी केली आहे. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म्स या रिलायन्सच्या कंपनीतील ९.९९ टक्के समभाग खरेदी केले आहेत. फेसबुकच्या व्हॉट्‌सॲपद्वारे स्थानिक किराणा दुकानदारांशी जोडून व्यवसाय वाढविण्याचा रिलायन्सच्या ‘जिओ मार्ट’चा विचार आहे. सध्या ऑनलाइन किराणा व्यवसायात ८० टक्के वाटा बिग बास्केट आणि ग्राफर्स या कंपन्यांचा आहे.

अहवालातील वास्तव आणि अंदाज 

  • किरकोळ खरेदीमध्ये ऑनलाइनचा वाटा १०.७ टक्क्यांपर्यंत जाईल.
  • कोरोनामुळे ५० टक्के वेगाने वाढणारा ऑनलाइन किराणा व्यवसाय यंदा ८१ टक्के वेगाने वाढला.
  • ऑनलाइनकडे ग्राहक वळल्याने ऑनलाइन पेमेंट यंत्रणाही अधिक चांगल्या प्रकारे विकसीत होईल.
  • व्हॉट्‌सॲपद्वारे खरेदीचा ट्रेंड येऊ शकतो.
  • किराणा व्यतिरिक्त वस्तूंच्या खरेदीतही १६.१ टक्के वेगाने वाढ होईल.

या वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीला प्राधान्य
किराणा, फॅशनेबल वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आरोग्य सुविधा उपकरणे.
६० टक्के - भारतातील एकूण ऑनलाइन खरेदीत किराणा मालाचा वाटा 
३ लाख - दररोजची ऑनलाइन नोंदणी (२०१९)
५० लाख - दररोजची ऑनलाइन नोंदणी (२०२४ मधील अंदाज)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT