money esakal
अर्थविश्व

Tax Collection : सरकार मालामाल! प्रत्यक्ष कर संकलनात झाली वाढ; वाचा काय आहे आकडेवारी

कर संकलन उत्पन्नातून सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

कर संकलन उत्पन्नातून सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे 26% वाढ नोंदवण्यात आली आहे.

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनातही सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर 2022 पर्यंत आगाऊ कर संकलन 5.21 लाख कोटी रुपये झाले. अॅडव्हान्स डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये वार्षिक 12.83 टक्के वाढ झाली आहे. मात्र, या कालावधीत मोठी रक्कमही परत करण्यात आली. आकडेवारीनुसार, 2.27 लाख कोटी रुपयांची रक्कमही परत करण्यात आली.

हेही वाचा : कंपन्यांचे मुल्यांकन लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक ठरेल फायदेशीर

सरकारी आकडेवारीनुसार, FY23 साठी 17 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलनाची रक्कम 11,35,745 कोटी रुपये होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 9,47,959 कोटी रुपये होती. म्हणजेच वार्षिक आधारावर प्रत्यक्ष कर संकलनात 19.81% वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे 17 डिसेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11,35,754 कोटी रुपये होते. यामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स 6,06,679 कोटी रुपये, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह वैयक्तिक कर 5,26,477 कोटी रुपये होता.

एकूण प्रत्यक्ष कर संकलन 13,63,649 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 10,83,150 कोटी रुपये होते. म्हणजेच, वार्षिक आधारावर एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 25.90% वाढ झाली आहे. एकूण संकलनामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स रु. 7,25,036 कोटी आणि वैयक्तिक आयकरचा समावे आहे. ज्यामध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स रु. 6,35,920 कोटी आहे.

आगाऊ कर संकलनाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, FY23 च्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत 17 डिसेंबरपर्यंत संकलन 5,21,302 कोटी रुपये होते. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 4,62,038 कोटी रुपये होता. एकूणच, वार्षिक आधारावर आगाऊ कर संकलनात 12.83 टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT