IT EMPLOYEE  Sakal
अर्थविश्व

Government Decision : आयटी कर्मचाऱ्यांना 'यापुढे'....सरकारची मोठी घोषणा!

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या काळात घरातून काम सक्तीने सुरू झाले होते, आता कर्मचाऱ्यांना घरातून काम करणे आवडू लागले आहे. आता आयटी क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आयटी कर्मचाऱ्यांना आता पुढील (2023) वर्षापर्यंत घरून काम करण्याची परवानगी मिळाली आहे.

केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात SEZ च्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आयटी युनिट्सच्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी घोषणा सरकारने केली आहे.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एक युनिट आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास किंवा विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी देऊ शकते.

सरकारने विशेष आर्थिक झोनमधील IT/ITES युनिट्सना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत काही अटींसह घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

अधिसूचनेनुसार, देशातील या निर्णयाचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे तात्पुरते अपंग आहेत, जे कार्यालयापासून दूर प्रवास करत आहेत.

सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे की या युनिट्सना घरातून काम करण्याची किंवा झोनच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी काम करण्याची परवानगी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याची आवश्यकता नाही. पण त्याची यादी त्यांना युनिटमध्ये ठेवावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT