IRCTC sakal
अर्थविश्व

IRCTC News : रेल्वेचं खासगीकरण अटळ? केंद्र सरकार विकणार...

सरकार या कंपनीतील 5 टक्के हिस्सेदारी विकणार आहे

सकाळ डिजिटल टीम

सरकारने रेल्वेच्या IRCTC मधील हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली होती, ज्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. सरकार या कंपनीतील 5 टक्के हिस्सेदारी विकणार आहे, जी OFS म्हणजेच ऑफर फॉर सेलद्वारे असेल.

15 आणि 16 डिसेंबर रोजी शेअर्स विकले जातील, म्हणजेच आजपासून ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे सरकारने कंपनीतील आपला हिस्सा विकण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर IRCTC च्या शेअरच्या किमतीत 5 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

ऑफर फॉल सेलची किंमत 680 रुपये निश्चित करण्यात आली आहे. विक्रीसाठी ऑफर (OFS) आजपासून बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सुरू झाली आहे.

IRCTC ची OFS कधी उघडेल?

IRCTC च्या वतीने असे सांगितले आहे की, सरकार IRCTC चे 2 कोटी इक्विटी शेअर्स विकण्याचा प्रस्ताव देत आहे. कंपनीच्या एकूण जारी केलेल्या इक्विटी समभागांपैकी हे प्रमाण 2.5 टक्के आहे. यासाठी बिगर किरकोळ गुंतवणूकदार 15 डिसेंबरपासून तर किरकोळ गुंतवणूकदार 16 डिसेंबरपासून सदस्यत्व घेऊ शकतात.

कंपनीची आर्थिक स्थिती आहे :

चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत, IRCTC ने 226 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात 42 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल 99 टक्क्यांनी वाढून 806 कोटी रुपये झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 405 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 405 कोटी रुपये होते, जे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 105 टक्क्यांनी वाढून 832 कोटी रुपये झाले आहे.

शेअर बाजारात चांगली सुरुवात :

14 ऑक्टोबर 2019 रोजी IRCTC समभागांनी बीएसईवर चांगली सुरुवात केली. त्याचे शेअर्स 320 रुपये प्रति शेअरच्या इश्यू किंमतीपासून 101.25 टक्के प्रीमियमसह 644 रुपयांवर सूचीबद्ध झाले. त्याच वेळी त्याचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 626 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT