अर्थविश्व

झेन टेक्नॉलॉजीजच्या डिफेन्स स्टॉकमधून मिळेल भरघोस परतावा; तज्ज्ञांना विश्वास

झेन टेक्नॉलॉजीजच्या डिफेन्स स्टॉकमध्ये 1 महिन्यात तब्बल 140 टक्के परतावा आणखी वाढ अपेक्षित असल्याचा तज्ज्ञांना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारने ड्रोन उत्पादक कंपन्यांसाठी 120 कोटी रुपयांची PLI योजना जाहीर केल्यानंतर झेन टेक्नॉलॉजीजच्या (Zen Technologies) स्टॉकच्या तेजीत आणखी वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. देशातील शेअर बाजारात लिस्ट असलेली ही एकमेव ड्रोन बनवणारी कंपनी आहे. गेल्या एका महिन्यात त्याचा स्टॉक सुमारे 140 टक्के वाढला आहे.

नफा बुकिंगनंतर (Profit Booking) हा स्टॉक 250 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.ड्रोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी PLI योजना पाच वर्षांसाठी आहे आणि याचाच कंपनीला दीर्घकाळ फायदा होईल. हा स्टॉक आधीच खूप वाढला आहे आणि यामुळे, त्यात नफा बुकिंग (Profit Booking) केले जाऊ शकते.

नफा बुकिंग (Profit Booking) झाल्यावर त्यात नवीन पोझिशन घेतली जाऊ शकते. पारस डिफेन्सच्या आयपीओनंतर झेन टेक्नॉलॉजीज (Zen Technologies) एकमेव लिस्टेड ड्रोन उत्पादन कंपनी नसेल. पारस डिफेन्सही कंपनीही ड्रोन तयार करते. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि गेल्या दोन महिन्यांत त्याची ऑर्डर बुक दुप्पट झाली आहे. त्यांना गेल्या महिन्यात हवाई दलाकडून 150 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.

तज्ज्ञांनी कंपनीचा शेअर कमीवर आल्यास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कमी तरलतेमुळे (Liquidity), नफा बुकिंगमुळे (Profit Booking) आगामी ट्रेडिंग सत्रांमध्ये लो सर्किट लागू शकते. या स्टॉकचा सपोर्ट 170 रुपये आहे. येत्या काही महिन्यांत हा शेअर 240 ते 250 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT