Greenpanel Industries sakal
अर्थविश्व

Top Shares : 'या' शेअरमध्ये तगडा परतावा, तीन वर्षात 1 लाखाचे 10 लाख

शेअरमध्ये येईल 82% तेजी, एक्स्पर्ट्सकडून बाय रेटींग...

सकाळ डिजिटल टीम

वूडपॅनेल बनवणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजच्या (Greenpanel Industries) शेअर्समध्ये मजबूत तेजी येऊ शकते असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. ही तेजी तब्बल 82 टक्क्यांपेक्षाही जास्त असू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. (Greenpanel Industries share best return 1 lakh turned into 10 lakhs in three years)

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

3 वर्षात 1 लाखाचे 10 लाख

गेल्या 3 वर्षात, ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 921% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवारी एनएसईवर 3.76% वाढून 370 रुपयांवर बंद झाले.

ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजच्या शेअर्सने सुमारे 3 वर्षांपूर्वी 25 ऑक्टोबर 2019 रोजी पहिल्यांदाच एनएसईवर ट्रे़डींग सुरू केले त्यावेळी त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 36.55 रुपये होती. म्हणजेच गेल्या 3 वर्षांत त्याच्या शेअर्सची किंमत 333.45 रुपये अर्थात सुमारे 921% वाढली आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 ऑक्टोबर 2019 रोजी ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 10.21 लाख झाले असते.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या शेअरसाठी 668 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटींग कायम ठेवले आहे. ग्रीनपॅनल शेअर्सच्या सध्याच्या किंमतीपेक्षा हे टारगेट सुमारे 81.62 टक्क्यांनी जास्त आहे.

कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर जारी केलेल्या अहवालात आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय, बीओबी कॅपिटल मार्केट्सने एका अहवालात ग्रीनपॅनेल शेअर्समध्ये सुमारे 62% ने मजबूत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे 11.71 टक्‍क्‍यांची घसरण झाली असताना ब्रोकरेज कंपन्यांना शेअरमध्ये तेजीचा विश्वास आहे.

कंपनी काय करते ?

ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 4,580 कोटी आहे. कंपनी हाय क्वालिटी मीडियम डेन्सिटी घनता फायबरबोर्ड (MDF), प्लायवुड, डेकोरेटिव्ह विनियर, फ्लोअरिंग आणि डोअर्स तयार करण्याच्या व्यवसायात आहे. ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज आशिया आणि भारतातील सर्वात मोठी MDF उत्पादक आहे.

जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 76.1 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 28.6 कोटी होता. त्याच वेळी, जून तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 471.2 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 308.7 कोटी होता.

टिप :  मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : वैजापूरमध्ये बिबट्या विहिरीत अडकला

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT