GST Sakal
अर्थविश्व

जीएसटी वसुलीची गाडी पुन्हा रुळावर

जून महिन्यात जीएसटी वसुलीची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जून महिन्यात जीएसटी वसुलीची (GST Recovery) घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जुलै महिन्यात एक लाख १६ हजार ३९३ कोटी रुपये जीएसटी वसूल झाल्याने केंद्र सरकारला (Central Government) हायसे वाटले आहे. (GST Recovery Central Government)

अर्थ मंत्रालयाने जुलै महिन्यातील जीएसटी वसुली संदर्भात आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २२ हजार १९७ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, २८ हजार ५४१ रुपये राज्य जीएसटी, तर आंतरराज्य मालवाहतुकीवर आकारल्या जाणाऱ्या आयजीएसटी पोटी ५७ हजार ८६४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यामध्ये आयात मालावरील आकारल्या गेलेल्या २७ हजार ९०० कोटी रुपये कराचा आणि ७७९० कोटी रुपये उपकरणाचा समावेश आहे.

केंद्र सरकारला मे महिन्यात जीएसटीपोटी १,०२,७०९ कोटी रुपये मिळाले होते. तर एप्रिलमध्ये १,४१,३८४ लाख कोटींची विक्रमी महसूल प्राप्ती झाली होती. त्याआधी मार्चमध्ये १२३९०२ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये १,१३,१४३ कोटी रुपये, जानेवारीमध्ये १,१९,८७५ कोटी रुपये आणि डिसेंबर २०२० मध्ये १,१५,१७४ कोटी रुपये जीएसटी वसुली झाली होती.

जून महिन्यात जीएसटी वसुली मध्ये लक्षणीय घट झाली होती. कोरोना संकटाच्या सर्वत्र असलेल्या लॉकडाउन सदृश परिस्थितीमुळे जून महिन्यात ९२ हजार ८४९ कोटी रुपये एवढेच जीएसटी वसुली झाली. मागील आठ महिन्यांत जीएसटी वसुलीने एक लाख कोटींचा आकडा पार केला असताना जून महिन्यात झालेली घट अस्वस्थता वाढविणारी होती. असे असताना जुलैमधील जीएसटी वसुली अर्थव्यवस्थेतील सुधारणा दर्शविणारी असल्याचेही अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT