गेल्या अनेक दिवसांपासून केमिकल सेक्टरबाबत एक्सपर्ट सकारात्मक आहेत. अशात गुजरात अल्कलीजच्या (Gujarat Alkalies) शेअरने अनेक वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत हा शेअर सुमारे 328 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच मार्च 2020 मध्ये जर एखाद्याने या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 4.28 लाख रुपये झाले असते. (Gujarat Alkalies chemical stock have turned from 1 lakh into 4 lakhs in two and half year)
गुजरात अल्कलीज (Gujarat Alkalies) ही देशांतर्गत कॉस्टिक क्लोरीन उद्योगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. चढ-उतार असूनही, या मिडकॅप स्टॉकने कोरोना काळात आणि नंतरही चांगली कामगिरी केली आहे. सध्या हा स्टॉक 899.15 रुपयांवर ट्रे़ड करत आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत स्टॉकमध्ये 30 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या शेअरने एका वर्षात 14 टक्के परतावा दिला आहे.
अडीच वर्षांत 328% परतावा
गेल्या अडीच वर्षांत या शेअरने 328 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी अर्थात कोरोना आधी हा स्टॉक 210 रुपयांवर होता, आता हाच शेअर 900 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या दोन वर्षांत या समभागाने सुमारे 180 टक्के परतावा दिला आहे.
कंपनी कॉस्टिक सोडा, लिक्विड आणि गॅसेस क्लोरीन, हायड्रोजन पेरॉक्साईड, फॉस्फोरिक ऍसिड आणि ऍल्युमिनियम क्लोराईडसारखे प्रोडक्ट्स तयार करते. ते कापड, पल्प आणि पेपर, ऍल्युमिनियम, डिटर्जंट्स, साबण, रेयॉन, प्लास्टिक, फार्मा, वॉटर ट्रीटमेंट आणि ऍग्रीकल्चर केमिकल्ससह विविध उद्योगांमध्ये वापरले जातात.
कंपनीला उत्पन्नामध्ये 18 टक्के CAGR वाढीची अपेक्षा आहे आणि व्यवसाय विभागांमध्ये चांगली वाढ होईल असे एचडीएफसी सिक्युरिटीज फंडामेंटल रिसर्च ऍनालिस्ट कुशल रुघानी यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 22 मध्ये 55 टक्के वाढीसह 3,759 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. आर्थिक वर्ष 22-24 मध्ये 29 टक्के सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने पुढील दोन तिमाहीसाठी 1,077 रुपयांचे टारगेट दिले आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.