HDFC Bank
HDFC Bank  esakal
अर्थविश्व

HDFC, PNB चा ग्राहकांना झटका! गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये होणार वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : HDFC आणि PNB या दोन बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला असून या बँकांच्या गृहकर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. १ जून पासून म्हणजे आजपासूनच हा निर्णय या दोन्ही बँकांकडून लागू होणार आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. (HDFC and PNB gives shock to customers Home loan EMI will increase)

HDFC नं आपल्या गृहकर्जांवरील रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) वाढ केली आहे, यामुळं अॅडजस्टटेबल गृहकर्जांमध्ये ५ बेसिस पॉईंटनं वाढ होणार आहे. त्यामुळं गृहकर्जांचे हप्ते वाढणार आहेत. १ जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

त्याचबरोबर पंजाब नॅशन बँक अर्थात PNB नं देखील आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. पीएनबीनं तर आपल्या कर्जाच्या व्याज दरात १५ बेसिस पॉईंटनं वाढ केली आहे. याचा परिणाम पीएनबीच्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होणार आहे. यामुळं कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. हा नियमही १ जूनपासून अर्थात आजपासून लागू होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो रेटमध्ये ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती, त्यामुळं रेपो रेट ४.४० टक्के झाला. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर देशातील अनेक बड्या बँकांनी आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी एसबीआयनं आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता एचडीएफसी आणि पीएनबीनं देखील वाढ केली आहे.

ग्राहकांवर हप्त्यांचं वाढणार ओझं

याशिवाय बँकेनं आपल्या NEFT आणि RTGS व्यवहारांच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच NACH ने देखील ई-मँडेट चार्जेस रिवाईज केले आहेत. त्यामुळं ऑफलाईन व्यवहारांसाठी RTGS शुल्क २४.५० रुपये तर ऑनलाईन व्यवहारांसाठी २४ रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी हे शुल्क २० रुपये इतकं होतं. तसेच पाच लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या आरटीजीएस शुल्कात वाढ करुन ते ४९.५० रुपये केलं आहे. यापूर्वी ही किंमत ४० रुपये होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT