HDFC  google
अर्थविश्व

HDFC बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढवले FD चे दर; मिळणार एवढे टक्के रिटर्न

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर एचडीएफसी बँकेने एफडी (FD) दर वाढवण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

एचडीएफसी (HDFC) बँकेने मुदत ठेव व्याजदर (FD Rates) वाढवले ​​आहेत. बँकेने महिनाभरात ही दुसरी दरवाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने एफडी दरात 50 आधार अंशांची वाढ केली आहे आणि नवीन दर 26 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate)  वाढ केल्यानंतर एचडीएफसी (HDFC) बँकेने एफडी दर (FD Rates) वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाई पाहता रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करत आहे, त्यानंतर बँकाही एफडी दर वाढवत आहेत.

एचडीएफसी (HDFC)  बँकेच्या म्हणण्यानुसार, आता 61 दिवस ते 89 महिन्यांच्या FD वर 4.5% पर्यंत व्याज दिले जात आहे. पूर्वी हा दर 5% टक्के होता. अशा प्रकारे व्याजदरात 50 आधार अंशांनी वाढ करण्यात आली आहे. HDFC बँक 90 दिवस ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी एफडी (FD)  वर 4.50% टक्के व्याज देत आहे, तर आधी 4.25 टक्के व्याज मिळायचे.

6 महिन्यांच्या ते 9 महिन्यांच्या एफडी (FD)  वरील व्याजदर 5% टक्क्यांवरून 5.25% टक्के करण्यात आला आहे. 5.50% टक्के व्याज मुदत ठेवींवर 9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी उपलब्ध आहे. नवीन दरानुसार 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडी (FD)  वर 6.10% टक्के व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे, 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 6.15 टक्के व्याज मिळत आहे.

इतर बँकांप्रमाणेच, एचडीएफसी (HDFC)  बँक देखील वृद्धांसाठी अधिक व्याजदर देते. एचडीएफसी बँकेच्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेधारकांना मुदत ठेवींवर 0.50% टक्के अतिरिक्त व्याज मिळते. इतर बँकाही ज्येष्ठ नागरिकांना जवळपास तेवढेच अतिरिक्त व्याज देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT