HDFC bank will open 25 more branches in the Pune District 
अर्थविश्व

‘एचडीएफसी बँक' पुणे जिल्ह्य़ात उघडणार 25 शाखा  

सकाळ वृत्तसेवा

पुणे: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ‘एचडीएफसी बँके’ने पुण्यात नुकतीच शंभरावी शाखा सुरु केली आहे. सॅलिसबरी पार्क येथे ही शाखा सुरु करण्यात आली आहे. बँकेची येत्या दोन वर्षांत जिल्ह्य़ामध्ये आणखी 25 शाखा सुरू करण्याची योजना असल्याचे देखील यावेळी सांगितले. पश्चिम विभागाच्या ब्रँच बँकिंग विभागाचे प्रमुख राकेश कुमार रेलान यांच्या हस्ते सॅलिसबरी पार्क येथील शंभराव्या शाखेचे उद्घाटन झाले. 

रेलान म्हणाले,की हा महत्त्चपूर्ण टप्पा पार करत असतांना बँकेने अतिशय वेगाने शाखांचे जाळे वाढवले आहे.  भांडारकर रस्त्यावर 1996 मध्ये पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू केल्यापासून शंभरावी शाखा सुरू करण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच महत्त्वाचा आहे. बँकेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून बँकिंग सेवा नेट बँकिंग आणि मोबाईल अशा बँकिंग विविध डिजिटल माध्यमातून उपलब्ध केली आहे. एचडीएफसी बँकेने नेहमीच बँका पोहोचू न शकणार्‍या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आर्थिक विकासाबरोबरच लोकांमध्ये रोजगार निर्मितीवरही भर दिला आहे. महाराष्ट्रातील 28 लाख लोकांना आमच्या या कार्याचा लाभ झाला आहे.''

देशभरात एचडीएफसी बँकेच्या 52 टक्के शाखा या निमशहरी आणि ग्रामीण भागात आहेत. सप्टेंबर अखेपर्यंत बँकेच्या ग्रामीण भागात 5 हजार 314 शाखा असून तर 13 हजार 514 एटीएएम आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT