Mutual Fund Sakal
अर्थविश्व

HDFC Mutual Fund: एचडीएफसी आणतंय 2 नवीन फंड, कमाईची उत्तम संधी!

तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चांगली योजना शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

HDFC Mutual Fund : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चांगली योजना शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. HDFC म्युच्युअल फंड HDFC निफ्टी 100 इंडेक्स फंड (HDFC NIFTY 100 Index Fund) आणि HDFC निफ्टी 100 इक्वल वेट इंडेक्स फंड (HDFC NIFTY100 Equal Weight Index Fund) या दोन नवीन योजना आणत आहे. ही नवीन फंड ऑफर (NFO) 11 फेब्रुवारी 2022 रोजी गुंतवणुकीसाठी उघडेल. तर 18 फेब्रुवारी 2022 रोजी योजना बंद होतील. (HDFC brings 2 new funds)

किमान 5000 रुपयांची गुंतवणूक

एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या दोन्ही योजनांमध्ये किमान 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह कोणीही गुंतवणूक सुरू करू शकतो. दोन्ही एनएफओ हे ओपन एंडेड फंड आहेत. म्हणजेच, गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा या योजनांमधून बाहेर पडू शकतात किंवा रक्कम रिडीम करू शकतात. HDFC निफ्टी 100 इंडेक्स फंडाचा बेंचमार्क NIFTY 100 TRI आहे. तर, HDFC निफ्टी 100 इक्‍वल वेट इंडेक्‍स फंडाचा बेंचमार्क निर्देशांक NIFTY 100 Equal Weighted TRI आहे. कृष्ण कुमार डागा हे दोन्ही NFO चे फंड मॅनेजर आहेत.

कोणी गुंतवणूक करावी ?

दोन्ही NFOs द्वारे, गुंतवणूकदारांना भारतातील लार्ज कॅप कंपन्यांचे एक्सपोजर मिळेल. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, मार्केट कॅपच्या आधारावर लिस्टेड भारतीय कंपन्यांमध्ये लार्ज कॅप्सचा वाटा 68 टक्के आहे. दोन्ही एनएफओद्वारे कंपनीने एचडीएफसी एमएफ इंडेक्स सोल्युशन्स पोर्टफोलिओचा विस्तार केल्याचे एचडीएफसी एएमसीचे एमडी आणि सीईओ नवनीत मुनोत म्हणाले. याद्वारे ग्राहकांना भारतातील 100 मोठ्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. HDFC AMC ही इंडेक्स सोल्युशन्समधील सर्वात जुनी कंपनी आहे. कंपनी 19 वर्षांहून अधिक काळ इंडेक्स फंड मॅनेज करत आहे. एचडीएफसी एएमसीच्या ऍसेट अंडर मॅनेजमेंट 4.41 लाख कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT