home buyers Festive offers finance investment mumbai esakal
अर्थविश्व

Buy Home : घर खरेदीदारांना सणांनिमित्त सवलत

विक्रीला चालना देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना महामारीमुळे दोन वर्षे गणेशोत्सवावर निर्बंध असल्याने राज्यभरात गणेशोत्सव साधेपणाने पार पडला. या उत्सवानिमित्त मुंबईतील विकसक घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात सवलत किंवा सोन्याची नाणी अशी आकर्षक सवलत देण्याचा विचार करत आहेत. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा सणाचा हंगाम भारतात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हा सणांचा काळ घर खरेदीसाठी शुभ मानला जातो. या कालावधीत घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विकसक विविध सवलती देण्याचा विचार करत आहेत.

सवलती दिल्यास ग्राहक घर खरेदी करत असल्याने सवलती देण्याची तयारी विविध विकसक करत आहेत. असे बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष हरिश जैन यांनी सांगितले. ऑफर आणि सवलती गुंतवणूकदारांसाठी एक मोठा दिलासा आहे.

विकसकांकडून विविध ऑफर

विकसक सणाच्या कालावधीत लवचिक पेमेंट मोड आणि पर्याय ऑफर करण्याचा विचार करत आहेत. सरकारी मदतीमुळे ग्राहकांना स्टॅम्प ड्युटीच्या ऑफरही दिल्या जाऊ शकतात. शिवाय, विकसक घर खरेदीवर सुमारे ५ ते १० ग्रॅम सोन्याची नाणी देण्याच्या ऑफरचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT