Home sale esakal
अर्थविश्व

Home Sale : देशात यंदा आठ वर्षांतील उच्चांकी गृहविक्री

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता देशातील गृहनिर्माण क्षेत्र पूर्वपदावर आले असून, घरांची मागणी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता देशातील गृहनिर्माण क्षेत्र पूर्वपदावर आले असून, घरांची मागणी वाढली आहे.

मुंबई - देशात यंदा गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक गृहविक्रीचा विक्रम नोंदवला जाईल, असे नाईट फ्रँक संशोधन संस्थेने म्हटले आहे.

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता देशातील गृहनिर्माण क्षेत्र पूर्वपदावर आले असून, घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे २०२२ या वर्षात २०१४ नंतरची सर्वाधिक गृहविक्री नोंदवली जाईल, असे या संस्थेने म्हटले आहे. कोरोना काळात खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या किंवा गृहखरेदीची योजना पुढे ढकलेल्या ग्राहकांनी या वर्षी गृहखरेदीवर खर्च करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने घरांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

देशातील बहुतांश सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. ३१ मार्च २०२२ अखेर देशातील अकरा प्रमुख विकसकांनी आठ अब्ज डॉलरची गृहविक्री केली होती. त्या आधीच्या वर्षातील मार्च अखेरच्या तुलनेत त्यात २५ टक्के वाढ नोंदवली होती, असे निराक्षण क्रिसिल पतमानांकन संस्थेने नोंदवले आहे.

मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकच्या मते, २०२२ मध्ये देशातील सात महत्त्वाच्या शहरांमध्ये ३,६४,९०० पेक्षा जास्त घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी विक्री झालेल्या २,३६,५०० घरांपेक्षा ५४ टक्के जास्त आहे. यापूर्वी २०१४ सर्वांत जास्त ३.४३ घरांची विक्री झाली होती. मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, पुणे हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या शहरांसह इंदूर, जयपूर आदी छोट्या शहरांमध्ये विक्री वाढली आहे, असेही निरीक्षण अॅनारॉकने नोंदवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT