ANI
अर्थविश्व

गृहिणींना व्यवसायाची संधी, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबाबत

सुमित बागुल

या योजने अंतर्गत ५० हजार ते १० लाखांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिली जातात.

तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करायच्या विचारात आहात ? अशात पैशांच्या कमतरतेमुळे तुमचा व्यवसाय सुरु करण्यास अडथळे येतायत ? जर असं असेल तर सरकारकडून आता तुम्हाला मदत मिळू शकते. म्हणजेच आता तुमची पैशांची कमतरता भरून निघणार आहे. पंतप्रधान 'मुद्रा लोन' या योजनेद्वारे जर तुम्ही घरातील महिलेच्या नावाने कर्जासाठी अर्ज केल्यास तुम्हाला सहज कर्ज मिळू शकतं.

जाणून घेऊयात या योजनेच्या फायद्यांना :

या योजने अंतर्गत ५० हजार ते १० लाखांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिली जातात. या कर्जाच्या स्कीम्सची नावं 'शिशु', 'किशोर' आणि 'तरुण' अशी आहेत.

  • शिशु योजनेत ५० हजारांपर्यंतच कर्ज मिळतं.

  • किशोर योजनेअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचं कर्ज मिळतं.

  • तरुण योजनेअंतर्गत ५ लाख ते १० लाखांचं कर्ज मिळतं.

या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणावर भर दिला गेलाय. त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यायचं झाल्यास घरातील महिलेच्या नावावर तुम्ही कर्ज काढू शकतात. असं केल्याने तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. देशातील महिलांना अधिक सक्षम आणि जागरूक करण्यासाठी अशा योजना सध्या राबवल्या जात आहेत.

या योजनेअंतर्गत महिला किंवा पुरुष दोघेही कर्ज घेऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सरकारकडून ठरवलेल्या सरकारी किंवा प्रायव्हेट बँकांच्या ठराविक शाखेत जाऊन आपला अर्ज द्यावा लागतो. बॅंकेत तुम्हाला या बाबत अधिकची सर्व माहितीही मिळते. व्यवसाय सुरु करणाऱ्यांचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कर्ज दिलं जात नाही. या योजनेअंतर्गत कर्ज घेणारे लाभार्थी हे वेंडर्स, ट्रेडर्स, दुकानदार किंवा इतर लहान व्यवसाय चालवणारे असतात.

तुम्ही देशातील सर्व सरकारी बँकांमधून कर्ज काढू शकतात. याशिवाय खासगी HDFC बँक, ऍक्सिस बँक, ICICI बँक, सिटी युनियन बँक, DBC बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक बँक. नैनिताल बँक, साऊथ इंडियन बँक, येस बँक, आणि IDFC बँक यांचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय तुम्ही को ऑपरेटिव्ह बँक, ग्रामीण बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून देखील मुद्रा लोन घेऊ शकतात.

कर्ज घेण्यासाठी तुम्हालासर्वात आधी www.mudra.org.in या संकेत स्थळावत जावं लागेल. या संकेतस्थळावरून तुम्हाला कर्जासाठीचा ऑनलाईन अर्ज देखील भरता येऊ शकतो. तुम्ही 'मुद्रा लोन' अंतर्गत कर्ज घेऊ शकतात की नाही हे तपासण्यासाठीhttps://merisarkarmeredwar.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT