अर्थविश्व

"एचपीसीएल'ची 74 हजार कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: तेल आणि वायू क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) विस्तारासाठी 74 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांत नफा दुपटीने वाढण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. खुराणा यांनी सांगितले. 

कंपनीकडून पुढील पाच वर्षांत गुंतवणूक आणि विस्तार आराखडा तयार करण्यात आला आहे. रिफायनरीची क्षमता वाढवणे, वितरणाचे जाळे मजबूत करण्यावर, तसेच परदेशात इंधन निर्यातीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे खुराणा यांनी सांगितले. 74 हजार 200 कोटींच्या गुंतवणुकीपैकी 42 हजार कोटी कंपनी देशांतर्गत स्रोत विकसित करणे, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी खर्च करण्यात येतील. त्याशिवाय कंपनी 32 हजार कोटींचे कर्ज घेतले जाईल, अशी माहिती खुराणा यांनी सांगितले. इंधन वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीकडून पाईपद्वारे पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

मुंबई रिफायनरीसाठी पाच हजार कोटी, विशाखापट्टणम रिफायनरीसाठी 21 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. केंद्र सरकारकडून विजेवरील वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले असले, तरी आगामी दहा वर्षे इंधनाची मागणी कायम राहील, असे स्पष्टीकरण खुराणा यांनी दिले. सौदी अरॅमकोने रिलायन्स इंडस्ट्रीजशी करार केला असला तरी त्याचा फारसा परिणाम पश्‍चिम किनारपट्टीवर साकारण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावर होणार नाही, असेही खुराणा यांनी सांगितले. मागील तीन वर्षे कंपनीला सहा हजार कोटींचा नफा मिळाला आहे. नफ्यात सातत्य असून विस्तारामुळे पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षमता वाढेल. ज्यामुळे 2024 अखेर नफा दुप्पट होईल, असा विश्‍वास खुराणा यांनी व्यक्त केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT