IDBI bank bank
अर्थविश्व

IDBI बँकेची खास दिवाळी ऑफ; FD वर मिळणार एवढे टक्के रिटर्न

दिवाळीनिमित्त, आयडीबीआय (IDBI) बँकेने 'अमृत महोत्सव एफडी (FD)’ ही मुदत ठेव योजना सुरू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. सणासुदीच्या काळात अनेक बँका आपल्या ग्राहकांना चांगल्या ऑफर देत आहेत. दिवाळीनिमित्त, आयडीबीआय (IDBI) बँकेने 'अमृत महोत्सव एफडी (FD)’ ही मुदत ठेव योजना सुरू केली आहे. बँक या योजनेअंतर्गत ठेवींवर वाढीव व्याजदर देत आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना 555 दिवसांच्या कालावधीसाठी ठेवींवर 6.90 टक्के दराने व्याज मिळेल. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

बँकेने विविध मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे, जी 21 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या कालावधी नानात्र लागू होईल. 1  वर्षाच्या मुदत ठेवींवर व्याजदर 6.75 टक्के करण्यात आला आहे, तर दोन वर्षांच्या ठेवींवर आता 6.85 टक्के व्याज मिळेल.

अलीकडेच, आयडीबीआय (IDBI) बँकेने 31 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘IDBI ज्येष्ठ नागरिक ठेव’ आणि बँकेने 'अमृत महोत्सव एफडी (FD)’ या दोन योजना लोकप्रिय विशेष मुदत ठेव योजनांचा कालावधी वाढवला आहे. याशिवाय, बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 10 अशांनी वाढ केली आहे. IDBI बँकेच्या वेबसाइटनुसार, मुदत ठेवींचे व्याजदर 11 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT