gold silver price
gold silver pricesakal

Gold Rate: दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या नवे दर

आज सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे.
Published on

दिवाळींच्या दिवसांमध्ये सोने खरेदीवर जोर कायम आहे. अशात सोने चांदीच्या दरात अपेक्षेप्रमाणे तेजी दिसत आहे. आज सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,010 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,290 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 577 रुपये आहे. (gold silver price update 23 october 2022)

gold silver price
Gold Price: वसुबारसच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,720 रुपये

  • दिल्ली - 51,450 रुपये

  • हैदराबाद - 51,290 रुपये

  • कोलकत्ता - 50,780 रुपये

  • लखनऊ - 51,450 रुपये

  • मुंबई - 51,290 रुपये

  • नागपूर - 51,320 रुपये

  • पुणे - 51,310 रुपये

gold silver price
Gold Rate: दिवाळीच्या तोंडावर सोने महागले! जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

gold silver price
Gold Investment : धनत्रयोदशीला सोनं की डिजिटल गोल्ड?; कोणती गुंतवणूक फायदेशीर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com