IDBI-and-LIC
IDBI-and-LIC 
अर्थविश्व

आयडीबीआय एलआयसीकडे

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेमधील हिस्सेदारी ५१ टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बॅंकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह देशभरात १३ नवी केंद्रीय विद्यालये सुरू करणे या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. 

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, झारखंडमधील सिंद्री आणि बिहारमधील बरौनी या खतनिर्मिती प्रकल्पांना १२५७.८२ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमधील सरकारची हिस्सेदारी ७६ टक्‍क्‍यांवरून ६६.१३ टक्‍क्‍यांवर आणण्यासही मंजुरी दिली.
 
वाशीम, परभणीत केंद्रीय विद्यालये 
देशात १३ नवी केंद्रीय विद्यालये सुरू केली जाणार आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम येथे जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले जाईल. महाराष्ट्रातील परभणी, वाशीम या दोन जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश, मणिपूर, बिहार, झारखंड, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केंद्रीय विद्यालये सुरू होतील. सध्या १२ लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयांमध्ये शिकत आहेत. वाढीव विद्यालयांमुळे विद्यार्थी संख्येत १३ हजारांनी वाढ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT