IDBI Bank Esakal
अर्थविश्व

एलआयसी (LIC) नंतर आता आयडीबीआय (IDBI) बँकेचे होणार खाजगीकरण

केंद्र सरकार आयडीबीआय बँक महागड्या दराने विकण्याचा विचार करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सरकार आयडीबीआय बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आयडीबीआय बँक महागड्या दराने विकण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार केंद्र सरकार सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँक लिमिटेडसाठी सुमारे ६४० अब्ज रुपये (म्हणजे $ ७.७अब्ज) मूल्यांकन शोधत आहे. जर असे झाले तर सरकारच्या हिश्श्याची ही सर्वात मोठी विक्री ठरू शकते. केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) संयुक्तपणे IDBI बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा विकणार आहेत. ब्लूमबर्ग न्यूजच्या अहवालानं शुक्रवारी आयडीबीआय बँकेचे शेअर्स 3% वाढले.

सरकारने मागवल्या निविदा

सरकार आयडीबीआय बँकेच्या गुरुवारपर्यंत सुमारे $५.८ अब्जच्या बाजारभावावर आधारित सुमारे 33% प्रीमियमची मागणी करत आहे. सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला IDBI बँकेतील ६०.७२ % हिस्सेदारी विकण्यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले आहे.

देशी-विदेशी बँकांनी दाखवला रस

देशी आणि विदेशी बँकांपासून ते बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि खाजगी इक्विटी फंडांपर्यंतच्या संभाव्य गुंतवणूकदारांनी या मालमत्तेत रस दाखवला आहे. प्रक्रिया पुढे गेल्यास नोव्हेंबरनंतर बोलीदारांना नियामक मान्यता आणि सुरक्षा मंजुरी मिळू शकते. बहुसंख्य भागभांडवलांची विक्री १ एप्रिलपासून पुढील आर्थिक वर्षात लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT