PM Kisan Yojana
PM Kisan Yojana esakal
अर्थविश्व

PM Kisan च्या दहाव्या हप्त्याचा SMS आला नाही? या गोष्टी करा फॉलो

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (Prime Minister Kisan Samman Nidhi) दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवीन वर्षात (New Year 2022) आनंदाची बातमी आहे. आज, शनिवारी (1 जानेवारी 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर डिसेंबर - मार्चचा हप्ता म्हणून 2000-2000 रुपये पाठवले आहेत. तुम्हाला अजून मेसेज मिळाला नसेल, तर काळजी करू नका. आधी तुमच्या तुमच्या बॅंकेचे अपडेट्‌स व स्टेटस तपासून पाहा. (If you have not received the SMS of the tenth installment of PM Kisan, follow these things)

अपडेट चेक करण्यासाठी खालील स्टेप्सचा फॉलो करा

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला 'Farmers Corner'चा पर्याय मिळेल

  • येथे 'Beneficiary Status' या पर्यायावर क्‍लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.

  • नवीन पेजवर आधार (Aadhaar Card) क्रमांक, बॅंक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर 'Get Data' वर क्‍लिक करा.

  • येथे क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बॅंक खात्यात जमा झाला.

तरीही हप्ता न मिळाल्यास मंत्रालयात (Ministr) याप्रमाणे करा संपर्क

  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261

  • पीएम किसान लॅंडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401

  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606

  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109

  • ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT