shares
shares 
अर्थविश्व

2 वर्षात हा शेअर 118 रुपयांवरुन 503 रुपयांवर, आणखी तेजीचे संकेत...

नमिता धुरी

मुंबई : शेअर बाजारात पैसे गुंतवताना गुंतवणूकदार चांगला परतावा शिवाय सुरक्षेचाही विचार करतात. पण शेअर मार्केटमध्ये जोखीम येतेच, त्यामुळे पैसे गुंंतवताना दमदार फंडामेंटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.

अशात एल्गी इक्विपमेंट्सचे (Elgi Equipments) शेअर्स चांगल्या शेअर्समध्ये गणले जातात. या कंपनीची स्थापना 1960 मध्ये झाली. कंपनी एअर कंप्रेसर आणि ऑटोमोटिव्ह इक्विपमेंटचे उत्पादन आणि विक्री करण्याच्या व्यावसायात गुंतलेली आहे.

एल्गी इक्विपमेंट्सचे शेअर्स सध्या 503 रुपयांवर ट्रेड करत आहेत. 13 नोव्हेंबर 2020 रोजी या शेअर्सची किंमत 118.38 रुपये होती आणि तेव्हापासून त्याने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, कंसोलिडेटेड बेसिसवर कंपनीचा नेट रेव्हेन्यू 738.72 कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 13.19 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचा नफाही 39 टक्क्यांनी वाढून 70.41 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे आरओई 18.6% आणि आरओसीई 20.5% आहे तर मार्केट कॅप 16,000 कोटी आहे.

एल्गीचा व्यवसाय 120 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे आणि 26 देशांमध्ये त्यांची उपस्थिती आहे. कंपनीचे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क जगभर पसरलेले आहे. एल्गीचे 350 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर्स आहेत.

एल्गी इक्विपमेंट्सचे भारत, यूएसए आणि इटलीमध्ये मॅन्युफॅक्टरींग फॅसिलिटीज आहेत. कंपनी जॉइंट वेंचरद्वारे अमेरिकन बाजारपेठेत आपल्या क्षमता विस्तारत आहेत. सिएटल, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये डिस्ट्रीब्यूशन वाढवत आहे. मंगळवारी हा शेअर 501.05 रुपयांवर उघडला आणि 506.70 रुपयांच्या उच्चांकावर गेला. बीएसईवर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 566 रुपये होता आणि 205.40 रुपयांचा निचांक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT