NEUROShield
NEUROShield Sakal
अर्थविश्व

मेंदूविकारांच्या अचूक निदानासाठी न्यूरोशिल्ड विकसित करणारी इनमेड प्राेग्नाॅस्टिक्स

- सलील उरुणकर

मधुमेह किंवा ह्रदयाशी संबंधित आजारांविषयी आपण सहजपणे आणि क्वचितप्रसंगी 'आभिमाना'ने लोकांना सांगतो, मात्र मेंदूविकारांबाबत बोलणे बहुतांशजण टाळतात किंवा अशा आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती टिंगलटवाळीचा विषय होतात. खरंतर मेंदूशी संबंधित अनेक आजारांचे निदान लवकर होऊ शकते आणि त्यानुसार त्यावर यशस्वी उपचारही होऊ शकतात. पण या आजारांना अजून समाजात 'स्टेटस' न मिळाल्यामुळे त्याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत आणि त्यामुळे उपचारांबाबतही उदासिनता दिसून येते. (In-Med Prognostics Launches A Brain Quantifying Analytics Tool — NEUROShield)

मूळचे गोव्याचे असलेले मात्र कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले राजेश कुमार पुरषोत्तम (Rajesh Kumar Purushottam) आणि मूळच्या पुड्डूचेरीच्या असलेल्या व सध्या अमेरिकत स्थायिक झालेल्या डाॅ लता पूनामल्ली (Dr Latha Poonamallee) यांनी मेंदूविकारांशी संबंधित अचूक निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाधारे काम करणारे न्यूरोशिल्ड ही प्रणाली विकसित केली. इनमेड प्रोग्नाॅस्टिक्स (InMed Prognostics) असे त्यांच्या स्टार्टअप कंपनीचे नाव.

न्यूरो-रेडिओलाॅजिस्ट, न्यूरो-फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ आणि जनरल फिजिशियन यांना रुग्णासंदर्भात अचूक व योग्य निदान करण्यासाठी न्यूरोशिल्ड ही प्रणाली मदत करते. त्यासाठी थ्री-डी एमआरआय (3D MRI) प्रतिमांद्वारे मेंदूशी संबंधित आवश्यक माहिती संकलित केली जाते आणि सर्वंकष विश्लेषण करून त्याचे निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांसमोर मांडले जातात. या निदान व निष्कर्षांच्या आधारे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील वैयक्तिक अनुभवानुसार संबंधित डाॅक्टर वा तज्ज्ञ रुग्णावरील उपचाराची दिशा ठरवतात.

राजेश यांनी बीई इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९३ मध्ये पुण्यातील थर्माक्स कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून शाॅप फ्लोर इंजिनिअर म्हणून कामास सुरवात केली होती. त्यानंतर त्यांनी केपीआयटी इन्फोसिस्टिम्स, मोटोरोला, जीई कॅपिटल इंटरनॅशनल सर्व्हिसेस, मोटोरोला इंडिया, वेदांता ग्रुप आदी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. तर, डाॅ लता यांनी मद्रास विद्यापीठामधून बीए व एमए तसेच पुड्डुचेरी विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील ओहिओ प्रांतातील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठातून त्यांना पीएचडी मिळाली असून सध्या त्या न्यू याॅर्कमधील न्यू स्कूल येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करीत आहेत.

इनमेड प्रोग्नाॅस्टिक्सच्या आधी राजेश यांनी २०१३ मध्ये स्टॅटिम हेल्थकेअर नावाने टेलिरेडिओलाॅजी सर्व्हिसेस रुग्णालयांना पुरविणारी स्टार्टअप सुरू केली होती. या स्टार्टअपच्या कार्यकाळात त्यांना रेडिओलाॅजी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटलिजन्स (artificial intelligence in radiology) तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणवले. २०१७ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राजेश डाॅ लता यांना भेटले व त्यावेळी रात्री जेवताना त्या दोघांनी या तंत्रज्ञानावर आधारित मेंदूविकार निदान करणारी प्रणाली विकसित करण्याचे ठरविले.

राजेश म्हणाले, "पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमधील न्यूरोलाॅजिस्ट डाॅ राहुल कुलकर्णी तसेच सह्याद्री हाॅस्पिटलमधील पिडियाट्रिक न्यूरोलाॅजिस्ट डाॅ दीपा दिवेकर यांनी सुरवातीच्या काळापासून खूप मदत केली."

न्यूरोशिल्ड नेमके कसे काम करते याविषयी अधिक माहिती देताना राजेश म्हणाले, "सामान्यतः रुग्ण फिजिशियनकडे गेल्यानंतर त्यांना न्यूरोलाॅजिस्टला भेटण्याचा व त्यापुढे एमआरआय स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. एमआरआय स्कॅन घेतल्यानंतर रुग्णाच्या मेंदूशी संबंधित सर्व माहिती (डेटा) हा एमआरआय मशीनमधूनच थेट संकलित केला जातो. रुग्णाच्या वय, लिंग व अन्य स्वरुपाच्या माहितीचा आधार घेऊन प्रगत विश्लेषण केले जाते. हे करीत असताना रुग्णाच्या वैयक्तिक तसेच संवेदनशील माहितीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी अशी माहिती झाकली जाते किंवा काढून टाकली जाते."

"आजारासंदर्भात आवश्यक माहिती एका क्लाउड प्लॅटफाॅर्मवर साठविली जाते. रेडिओलाॅजिस्टला ही माहिती एका क्लिकवर कोठूनही बघता येते. त्याचा अहवाल न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जनकडे पाठविला जातो. या अहवालातील निष्कर्ष तसेच संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाच्या अनुभवानुसार रुग्णावरील उपचाराची पुढील दिशा ठरविली जाते. न्यूरोशिल्डची अचूकता ९० टक्के असून आतापर्यंत १२०० रुग्णांची माहिती यशस्वीपणे संकलित करण्यात आली आहे," असेही राजेश यांनी सांगितले.

डाॅ लता म्हणाल्या, "साॅफ्टवेअर अ‍ॅज ए मेडिकल डिव्हाईस याबाबत नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार इनमेड प्रोग्नाॅस्टिक्सला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन (सीडीएससीओ) यांची मान्यता मिळाली आहे. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Government E-marketplace - GeM) यावरही नोंदणी करण्यात आली आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT