Income Tax Department  
अर्थविश्व

आयकर विभागाला Low Invoicingचे आव्हान, आयात वस्तूंच्या किंमतीत फेरफार

शेल एंटीटीज नावाने हा माल आयात केला जात होता.

ओमकार वाबळे

आयकर विभागाने दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये आयात केलेल्या गॅजेट्सच्या किंमतींमध्ये अफरातफर झाल्याचे पुरावे हाती लागले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक पार्टचे बिल्स तपासण्यात आले. व्यापाऱ्यांनी कमी-इनव्हॉइसिंग केल्याचं उघडकीस आलं आहे. या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या किंमती कमी दाखवून टॅक्स चुकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आयकर विभागाला होता. शेल एंटीटीज नावाने हा माल आयात केला जात होता.

गेल्या तीन वर्षांत शेल कंपन्यांचे बंदरात माल उतरवताना घोषित केलेल्या आयातीचे मूल्य 20 कोटी होते. मात्र, ही किंमत 2,000 कोटींपेक्षा जास्त असू शकते, असा दावा आयकर विभागाने केला आहे.

10 ऑक्टोबरला छापे टाकण्यास सुरुवात करण्यात आली आणि हळूहळू अनेक ठिकाणी एजन्सीने पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावरून हे स्पष्ट झाले की हा गट मोठ्या प्रमाणावर अंडर-इनव्हॉइसिंग आणि आयात केलेल्या मालाची चुकीची बिलं तयार करत आहे.

एजन्सीला रेकॉर्ड न केलेले व्यवहार, मालमत्तांमध्ये बेहिशेबी गुंतवणूक, संबंधित संस्थांनी घेतलेली बोगस कर्जे आणि इतर अनियमितता आढळली.

मोडस ऑपरेंडीमध्ये 'शेल'च्या नावाने कमी किंमतीच्या आणि आयात केलेल्या मालाच्या वर्णनाची चुकीची माहिती होती. यामार्फत कस्टम ड्यूटी टाळण्याचा हेतू आहे. बंदरावर मंजुरी मिळाल्यावर, अशा वस्तू भारतभर रोख व्यवहाराद्वारे वितरीत केल्या गेल्या आहेत, असे आयकर विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT