Income-Tax 
अर्थविश्व

इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंट ये सब जानता है!

ऋषभ पारख

‘आय नो व्हॉट यू डीड लास्ट समर’ नावाचा एक प्रसिद्ध हॉलिवूडपट आहे. याचप्रमाणे तुम्ही कुठे आणि काय-काय केले, हे इनकम टॅक्‍स डिपार्टमेंटला सर्वकाही माहीत असते.

कर वाचविण्यासाठी हजारो गुंतवणुकीच्या पद्धती आहेत. परंतु, काही जण कर कमी करण्यासाठी चुकीच्या वाटेने जातात. ही वाट त्यांनी अज्ञानामुळे अथवा लोभामुळे निवडलेली असते.  कोणत्याही करदात्याला इनकम टॅक्‍स कधीच चांगली बाब वाटत नाही. कारण, कोणाला कष्टानं कमाविलेल्या पैशातील काही हिस्सा दुसऱ्याला द्यायला आवडेल? कर चुकविण्याची वाट तुम्हाला महागात पडू शकते. मात्र, योग्य कर नियोजन (टॅक्‍स प्लॅनिंग) करून कर वाचवू शकता. 

कर नियोजन (टॅक्‍स प्लॅनिंग)
साध्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, ‘टॅक्‍स प्लॅनिंग’ म्हणजे इनकम टॅक्‍स कायद्यातील लागू होणाऱ्या सर्व तरतुदींचा वापर करून कर कमी करण्याची काळजी घेण्याची कला! कायद्याच्या चौकटीत आणि अल्पकालीन व दीर्घकालीन वित्तीय नियोजनाची काळजी घेऊन ‘टॅक्‍स प्लॅनिंग’मुळे कर दायित्व कमी करता येते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, यात तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचे विश्‍लेषण आणि कर बचतीच्या दृष्टिकोनातून आखलेल्या ‘फायनान्शिअल गोल’चा समावेश असतो. इनकम टॅक्‍स कायद्यातील कलम ‘८०’ सी आणि ‘८० डी’सारख्या सवलतींचा लाभ घेऊन योग्य मार्गाने कर बचत करता येते. अर्थात ‘टॅक्‍स प्लॅनिंग’ करून कायद्याच्या चौकटीत बसेल तेवढे पैसे वाचवा. कारण, एक पैशाची बचत म्हणजे एक पैशाची कमाई.

कर टाळणे 
इनकम टॅक्‍स कायद्यातील पळवाटा शोधून कर दायित्व कमी करणे आणि या मार्गाने कर टाळण्याचा प्रकार करदाते करतात. ही संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत दिसत असली तरी यामुळे कायद्याचा हेतू आणि आत्म्याला धक्का पोचतो. कागदावर कर नियोजन आणि कर चुकवेगिरी यात फारसा फरक दिसत नसला, तरी सरकारला आपल्याकडून कर टाळणे अपेक्षित नसते. प्रशासन कायम पळवाटा बुजवून टाकत असते. परंतु, कायम नवीन पळवाटा शोधणारेही असतात. प्रामाणिक नागरिक या नात्याने कर टाळण्यापासून दूर राहायला हवे.

कर चुकविणे 
एखादा व्यक्ती कपात, फायदे आणि सवलतींची रक्कम वाढवून अथवा उत्पन्न कमी दाखवून कर कमी करतो, त्याला करचुकवेगिरी म्हणतात. ही संपूर्णपणे बेकायदा प्रक्रिया असून, आजच्या काळातील शब्द वापरावयाचा झाल्यास ती ‘राष्ट्रविरोधी’ आहे. इनकम टॅक्‍स कायद्यात कर चुकविणाऱ्यांवर मोठा दंड तसेच कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
तेव्हा तुम्ही कोणता पर्याय निवडता आहात? 

(लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT