ITR 
अर्थविश्व

ITR भरण्याच्या मुदतीत वाढ; आता...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2018-19 साठीचा आयकर रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या मुदतीत आणखी दोन महिन्यांनी वाढ केली आहे. या नव्या मुदतीनुसार आयटी रिटर्न 30 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीवर नजर टाकत आयकर विभागाने कर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत.

'सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्स' (CBDT) विभागाने आर्थिक वर्ष 2018-19 साठी अंतिम तारीख 31 जुलै, 2020 दिली होती. मात्र, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, 30 सप्टेंबर, 2020 करण्यात आली आहे. 2018-19 या वर्षासाठी रिटर्न भरण्याची तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सलग तिसऱ्यांदा मुदतीत वाढ

आर्थिक वर्ष 2018-19 साठी रिटर्न भरण्याची मुदत 31 मार्च, 2020 होती. मात्र, त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यानुसार नवी मुदत 31 जुलै, 2020 केली होती. पण या मुदतीतही वाढ करण्यात आली असून, आता 30 सप्टेंबर, 2020 नवी मुदत करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा 

देशात सध्या कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हजारो करदात्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT