market sakal media
अर्थविश्व

अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी

कोरोना संकटामुळे प्रभावित झालेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे प्रभावित झालेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोळसा, नैसर्गिक वायू, पोलादासह ८ प्रमुख समजल्या जाणाऱ्या उद्योगांच्या उत्पादनात ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर ११.६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच प्रमुख उद्योग क्षेत्रातील उत्पादनात ६.९ टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल, रिफायनरी उत्पादने, पोलाद, वीज आणि सिमेंटचा वाटा ४०.२७ टक्के राहिला आहे. प्रमुख उद्योग क्षेत्रातील वृद्धीचा हा सलग तिसरा महिना आहे. आकडेवारीनुसार कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद, वीज आणि सिमेंटचे उत्पादन २०२१ मध्ये वार्षिक आधारावर वृद्धी दर्शवत आहेत. तर दुसरीकडे कच्चे तेल आणि खत उद्योगाच्या उत्पादनात घसरण झाल्याचे दर्शवले जात आहे. औद्योगिक उत्पादनातील वृद्धीमुळे रोजगार वाढीचेही सकारात्मक संकेत मिळत आहेत.

रोजगाराच्या संधी वाढल्या

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाने ऑगस्ट २०२१ साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या उद्योगांचा संयुक्त निर्देशांक जुलै २०२१ मध्ये १३४ होता, यात जुलै २०२० च्या तुलनेत ९.४ टक्के वृद्धी झाली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ नोंदविल्याने आर्थिक उलाढालीही वाढल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे पुन्हा रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

निर्देशांकांची गटांगळी सुरूच

मुंबई : नफावसुलीमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशीही घसरला. आज सेन्सेक्स २८६.९१ अंश, तर निफ्टी ९३.१५ अंशांनी घसरला. आजही सेन्सेक्सने ५९ हजारांचा स्तर कसाबसा टिकवून धरला. आज औषधनिर्मिती कंपन्या, तसेच वित्तसंस्था यांचे शेअर वाढले; तर बँका, धातूनिर्मिती, आयटी आणि वाहन उद्योग यांच्या शेअरचे भाव पडले. आज दिवसभर सेन्सेक्स ५९ हजारांच्या आसपास होता. त्याला व्यवहारादरम्यान ६० हजारांना स्पर्श करता आला नाही. मात्र त्याने ५९ हजारांच्या खाली गेला नाही. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ५९,१२६ अंशांवर टिकून राहिला, तर निफ्टी १७,६१८ अंशांवर स्थिरावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

Indian Agriculture: हवामान बदलावर मात करण्याची भारतीय शेतीत ताकद! जमिनीतील कार्बन साठवणुकीतून सुपीकताही वाढणार; नीरीच्या संशोधनातून स्पष्ट

IND vs NZ 4th ODI Live: सोपा झेल टाकल्यावर टीका, ३९ वर्षीय रोहित शर्माने सुपर डाईव्ह मारून केली बोलती बंद Video Viral

दोन T20 World Cup, २ कसोटी वर्ल्ड कप फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वन डे वर्ल्ड कप...; ICC च्या बैठकीत बऱ्याच हालचाली

Pune Tunnel Project: पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शहरात ३१ किलोमीटरचे भुयारी मार्ग; पुरंदर विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी

SCROLL FOR NEXT