nirmala sitharaman
nirmala sitharaman esakal
अर्थविश्व

केंद्राची तिजोरी मालामाल! सलग पाचव्या महिन्यात 1.30 लाख कोटींचा GST

सकाळ डिजिटल टीम

जीएसटी वसुलीची ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी जास्त आहे.

एका बाजुला महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजुला केंद्र सरकारला जीएसटी (GST) वसुलीत मात्र दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये जीएसटी कलेक्शन वाढलं असून ते १.३३ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जीएसटी वसुलीची ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी जास्त आहे. तर फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत २६ टक्के वाढ झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. (Gst Collection In February 2022)

फेब्रुवारीत सीजीएसटी कलेक्शन हे २४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं तर एसजीएसटी ३०,७७९ कोटी, आयजीएसटी ६७,४७१ कोटी रुपये आणि सेस १०,३४० कोटी रुपये इतका होता. केंद्र सरकारचा महसूल फेब्रुवारी महिन्यात रेग्युलर सेटलमेंटनंतर ५०,७८२ कोटी रुपये इतका आहे. यामध्ये राज्यांचा एकूण महसूल हा ५२,६८८ कोटी रुपये इतका आहे.

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) दिलेल्या माहितीनुसार, जीएसटीचे हे कलेक्शन इतिहासातील सर्वाधिक तिसरे कलेक्शन आहे. याआधी जानेवारी महिन्यात सरकारच्या तिजोरीत १,४०,९८६ कोटी रुपये जमा झाले होते. हा आतापर्यंतचा विक्रमी जीएसटी ठरला आहे. तर याआधी एप्रिल २०२१ मध्ये १,३९,७०८ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये १,३३,०२६ कोटी जीएसटीमधून केंद्र सरकारला मिळाले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहेत. त्यातच निर्बंध शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाची लाट आली. त्यामुळे जानेवारी महिन्यात अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले होते. तरीही जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. जीडीपीचा वृद्धी दर हा तिसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के इतका झाला. दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी हा दर कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT