Online Games  sakal
अर्थविश्व

Online Games : जगात भारतीय सर्वाधिक रिकामटेकडे? मोबाईल गेम खेळण्यात जगात 'दुसरे'

ऑनलाइन गेमिंग हा जगभरातील सर्वात मोठा व्यवसाय आहे.

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाइन गेमिंग हा जगभरातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. भारतही या क्षेत्रापासून दूर नाही. भारतात 39.6 कोटी लोक गेम खेळतात. गेमर्सच्या संख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. आशियातील टॉप 10 देशांमध्ये, 50 टक्क्यांहून अधिक गेमर्स एकट्या भारतात आहेत.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

आशिया-10 गेम्स मार्केट या शीर्षकाच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेमर्सची संख्या भारतात सर्वात जास्त वाढत आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये महसूल 21 टक्के वार्षिक दराने वाढला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कमाईच्या वाढीच्या दरापेक्षा गेमर्सची संख्या वेगाने वाढत आहे. दुसर्‍या अहवालानुसार, भारताचा गेमिंग बाजार 2022 मध्ये 2.6 अब्ज डॉलर असू शकतो आणि 27 टक्के वाढीसह 2027 मध्ये 8.6 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे.

अहवालानुसार, भारत, थायलंड आणि फिलीपिन्स हे देश कमाई आणि गेमर्सच्या संख्येच्या बाबतीत वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहेत. 10 आशियाई बाजारपेठांमध्ये जपान आणि कोरिया मोठी बाजारपेठ म्हणून गणले जातात आणि 77 टक्के महसूल या दोन देशांमधून येतो.

भारतात गेमर्सची संख्या वाढत आहे, त्यामुळे सरकार यातून उत्पन्न वाढवण्याच्या पर्यायावरही विचार करत आहे. ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी दर वाढवला जाऊ शकतो. सध्या ऑनलाइन गेमिंगवर 18% टक्के जीएसटी आहे. राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याची सूचना केली आहे. मंत्रिगटाचा अहवाल लवकरच जीएसटी परिषदेला चर्चेसाठी सादर केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT