अर्थविश्व

वाहनांचं मार्केट डाऊन; भारतात ऑटोमोबाईलमध्ये मंदी!

वृत्तसंस्था

तब्बल 35,000 कोटींची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत

नवी दिल्ली: देशातील ऑटोमोबाईल कंपन्यांसमोरील मंदीचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसते आहे. भारतातील आघाडीच्या प्रवासी वाहन आणि दुचाकी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या निर्मिती प्रकल्पांमध्ये कपात करण्याची किंवा उत्पादन थांबवण्याची घोषणा केली आहे. चालू तिमाहीतच हा निर्णय अंमलात आणला जाणार असून त्याचा कालावधी अनेक दिवसांचा असू शकतो. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना आधीच उत्पादित करण्यात आलेल्या कार किंवा दुचाकींची थंडावलेल्या बाजारपेठेत विक्री करता येणार आहे. कारण अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांकडे वाहनांची इन्व्हेन्ट्री (अतिरिक्त वाहने) तयार झाली आहे. मात्र या उत्पादन कपातीचा मोठाच फटका कंपन्यांच्या कामगिरीवर होणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या आणि वाढीचे उद्दिष्ट गाठणे त्यामुळे अवघड होऊन बसणार आहे. बाजारात आलेल्या मंदीमुळे जून महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील तब्बल 35,000 कोटी रुपयांच्या मूल्याची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात हा फटका अधिक असून तब्बल 2.5 अब्ज किंमतीची 30 लाख दुचाकी वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. दहापैकी सात आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन मे आणि जून महिन्यात थांबल्याचे जाहीर केले आहे. यात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅंड महिंद्रा यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. यातील काही कंपन्यांनी आधीच उत्पादन कपात सुरू केली आहे तर उर्वरित कंपन्या येत्या काही दिवसांतच उत्पादन थांबवणार आहेत. 'जर विक्रीच होणार नसेल तर वाहनांचे उत्पादन करून साठा करण्यात काय अर्थ आहे. मे आणि जून महिन्यात आम्ही आमच्या उत्पादनात कपात केली आहे', असे मत टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे प्रमुख मयंक पारिख यांनी व्यक्त केले आहे.
उत्पादन कपातीमुळे मे-जून महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचे उत्पन्न 20-25 टक्क्यांनी घटणार आहे. कंपन्यांपेक्षाही डिलर्सला मोठा फटका बसला आहे. नेहमीपेक्षा 50 टक्के अधिक राखीव वाहने डिलर्सकडे पडून आहेत. 
काही निवडक वाहन उत्पादक कंपन्याचे शट-डाऊनचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

मारुती सुझूकी  - 23 जून ते 30 जून
होंडा कार्स इंडिया - 5 जून ते 8 जून
टाटा मोटर्स -  27 मे ते 3 जून 
रेनॉ निसान - 26 मे ते 5 जून
होंडा मोटरसायकल अॅंड स्कुटर्स इंडिया -  4 जून ते 11 जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: बोलता बोलता आला हार्ट अटॅक; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांबद्दल महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा

Pune News: बहिणीला भाऊबीजेसाठी घरी आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात भावाचा मृत्यू, नुकताच विवाह अन्..

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT