शिव नाडर google
अर्थविश्व

HCL चे संस्थापक शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात मोठ्या देणगीदारांची यादी गुरुवारी २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. एडलगिव हुरुन इंडिया फिलैन्थ्रॉपी लिस्ट २०२२  यांच्या मते, HCL चे संस्थापक शिव नाडर हे सर्वाधिक देणगी देणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत प्रथम आले आहेत. त्याचवेळी विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

शिव नाडर यांनी २०२१- २२ या आर्थिक वर्षात १,१६१ कोटी रुपयांची देणगी दिली. दररोज ते ३.१८ कोटी रुपये देणगी देतात. त्याच वेळी, अझीम प्रेमजी यांनी या वर्षी ४८४  कोटी रुपयांची देणगी दिली, जी प्रतिदिन १.३२ कोटी रुपये आहे.

अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. अंबानींनी एका वर्षात ४११  कोटी रुपयांची देणगी दिली आणि याच काळात बिर्ला यांनी २४२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सुष्मिता आणि सुब्रतो बागची या आयटी कंपनी माइंड ट्री कंपनीशी संबंधित आहेत, राधा आणि एन.एस पार्थसारथी २१३ कोटी रुपयांच्या वार्षिक देणगीसह पाचव्या स्थानावर आहेत. तसेच गौतम अदानी या वर्षी १९०  कोटी रुपयांच्या देणगीसह यादीत सातव्या स्थानावर आहेत.

अहवालानुसार, झेरोधा येथील 36 वर्षीय निखिल कामथ एडलगिव हुरुन इंडिया फिलैन्थ्रॉपी लिस्ट मधील सर्वात तरुण देणगीदार आहेत. यावर्षी त्यांनी १०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मासह 'लॉर्ड्स'वर विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यास आश्चर्य वाटायला नको! गौतम गंभीरच्या सर्वच इच्छा होतील पूर्ण...

Pune News : अमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात तरुणाईने सक्रिय व्हावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे गोरखपूरमधील अनेक भाग जलमय

SCROLL FOR NEXT