अर्थविश्व

भारतीय कंपन्यांची परदेशात २.१० अब्ज डॉलर गुंतवणूक 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील कंपन्यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीत जानेवारी महिन्यात जवळपास ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. भारतीय कंपन्यांनी जानेवारीमध्ये परदेशात २.१० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. भारतीय कंपन्यांनी त्यांच्या परदेशातील व्यवसायात किंवा सहायक कंपन्यांमध्ये मागील वर्षी याच कालावधीत १.४७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. मागील वर्षातील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक १.९९ अब्ज डॉलरने अधिक आहे. भारतीय कंपन्यांनी जानेवारीत परदेशात गुंतविलेल्या एकूण गुंतवणूकीपैकी ७९.३८२ कोटी डॉलरची गुंतवणूक इक्विटी भांडवलाच्या स्वरुपात आणि ३६.८५५ कोटी डॉलरची गुंतवणूक डेट स्वरुपात केली आहे. उर्वरित ८९.०७५ कोटी डॉलरची गुंतवणूक गॅरंटीच्या स्वरुपात करण्यात आली आहे. 

परदेशात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. भारती एअरटेलने २४.७५ कोटी डॉलरची गुंतवणूक मॉरिशसमधील सहायक कंपनीत केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटने नेदरलॅंड्‌समधील सहायक कंपनीत २२.६०७ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT