sharemarke sakal media
अर्थविश्व

निर्देशांक वधारले! निफ्टी ८२ अंशांनी वाढला, तर सेन्सेक्स ५५ हजारांजवळ

कृष्ण जोशी

मुंबई : अमेरिका व युरोपमधील (America and Europe) सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय निर्देशांकांमध्ये (Indian economy) अर्धा टक्का वाढ झाली. निफ्टी (nifty) 82 अंशांनी वाढला तर 318 अंशांनी वाढलेला सेन्सेक्स (Sensex) आता 55 हजारांच्या टप्प्यात आला आहे.

आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 54,843 अंशांवर तर निफ्टी 16,364 अंशांवर स्थिरावला. या वाढीमुळे गुंतवणुकदारांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य दोन लाखकोटी रुपयांनी वाढले. चिनी सरकारने लादलेल्या निर्बंधांच्या भीतीमुळे आज आशियाई बाजार नरम गरम होते, त्याची कसर युरोप व अमेरिकेने भरून काढली. अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्याने तसेच इंग्लंडच्या जीडीपी मध्ये वाढ झाल्याने तेथील बाजार तेजीत होते. भारतीय बाजारांची वाटचाल त्यानुसारच झाली.

आज पॉवरग्रीड चा समभाग टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे 6.22 टक्के वाढला. तर टेक महिंद्र 63 रुपयांनी वाढून 1,387 रुपयांवर गेला. 36 रुपयांनी वाढलेला लार्सन टुब्रो 1622 रुपयांपर्यंत पोहोचला. इन्फोसीस (बंद भाव 1,690 रु), टाटा स्टील (1,435), टीसीएस (3,353) व एअरटेल (623) यांचेही दर वाढले. तर दुसरीकडे 31 रुपयांनी घसरलेला डॉ. रेड्डीज लॅब चा समभाग 4,712 रुपयांवर बंद झाला. महिंद्र आणि महिंद्र (776), रिलायन्स (2,110) यांचे दर घसरले.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 46,540

चांदी - 62,300

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT