share market sakal media
अर्थविश्व

शेअर बाजार उसळले ; सेन्सेक्स 514 अंश वाढला

कृष्ण जोशी

मुंबई : गेले दोन दिवस घसरण दाखवीत असलेल्या भारतीय शेअर बाजार (indian share market) निर्देशांकांनी आज जवळपास एक टक्क्याची जोरदार उसळी मारली. आज सेन्सेक्स (Sensex) 514.34 अंश तर निफ्टी (nifty) 165.10 अंश वाढला.

आज दुपारपर्यंत भारतीय शेअर बाजार चढउतार दाखवीत होते. पण जागतिक शेअर बाजारांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने दुपारनंतर भारतीय शेअर बाजारांमध्येही जोरदार खरेदी सुरु झाली. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स 59,005.27 अंशांवर तर निफ्टी 17,562 अंशांवर स्थिरावला. आज फक्त वाहननिर्मिती क्षेत्राच्या शेअरचे भाव घसरले. बँका, आयटी, एफएमसीजी आदी सर्व क्षेत्रांच्या शेअरचे भाव वाढले. आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 शेअरपैकी 24 शेअरचे भाव वाढले.

आज बजाज फायनान्स चा शेअर 367 रुपयांनी वाढून 7,810 रुपयांवर तर इंडसइंड बँक 46 रुपयांनी वाढून 1,137 रुपयांवर गेला. बजाज फिनसर्व्ह देखील 541 रुपयांनी वाढून 17,566 रुपयांवर तर टाटा स्टील 38 रुपयांनी वाढून 1,292 रुपयांवर गेला. गेले काही दिवस टाटा स्टीलसह धातूनिर्मिती क्षेत्राचे शेअर घसरण दाखवीत होते. मात्र आज त्या सर्वांनीच चांगलीच उसळी मारली. आयटीसी (बंद भाव 241 रु.), डॉ. रेड्डीज लॅब (4,854), टीसीएस (3,864), टेक महिंद्र (1,460), एचसीएल टेक (1,299), इन्फोसिस (1,717) यांचे भाव वाढले.

तर मारुतीचा शेअर 176 रुपयांनी घसरून 6,777 रुपयांवर आला. नेस्लेचा शेअरही 160 रुपयांनी कोलमडून 20,152 रुपयांवर आला. बजाज ऑटो (3,728) सह एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, अॅक्सीस बँक या शेअरचे भावही घसरले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,330 रु.

चांदी - 59,800 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

SCROLL FOR NEXT