Share Market sakal media
अर्थविश्व

निर्देशांकांची घसरण थांबली; सेन्सेक्स 113 अंश वाढला

कृष्ण जोशी

मुंबई : देशी गुंतवणुकदारांच्या खरेदीमुळे आज भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांकांमधील चार दिवस सुरु असलेली पडझड थांबली. सेन्सेक्स (Sensex) 113.11 अंशांनी तर निफ्टी (Nifty increases) 27 अंशांनी वाढला. आजही विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (Investors) विक्री सुरुच ठेवली, तरीही दिवसअखेर सेन्सेक्स 57,901.14 अंशांवर तर निफ्टी 17,248.40 अंशांवर स्थिरावला. आज बँका, वाहनउद्योग व औषधनिर्मिती कंपन्यांचे शेअर घसरले तर आयटी कंपन्यांचे शेअर (IT company shares increases) वाढले.

इन्फोसिस 37 रुपयांनी वाढून 1,771 रुपयांवर तर एचसीएल टेक 1,160 रुपयांवर गेला. टेक महिंद्र 1,652 रुपयांवर तर टीसीएस 3,581 रुपयांपर्यंत पोहोचला. त्याखेरीज बजाज फायनान्स (बंद भाव 7,028 रु.), टायटन (2,357), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,404), महिंद्र आणि महिंद्र, नेस्ले, टाटास्टील या शेअरचे भाव वाढले.

तर दुसरीकडे मारुती 114 रुपयांनी घसरून 7,452 रुपयांपर्यंत आला. एचडीएफसी (2,700), हिंदुस्थान युनिलीव्हर (2,309), आयटीसी (222) यांच्यासह बजाज ऑटो, सनफार्मा, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, कोटक बँक, अॅक्सीस बँक यांचे भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 48,350 रु.

चांदी - 61,400 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT