Share Market Sakal media
अर्थविश्व

निर्देशांकात घसरण; 62 हजारांवरून माघार

कृष्ण जोशी

मुंबई : गेले सात दिवस वाढ दाखवीत असलेले भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांक आज नफावसुलीमुळे घसरले. सेन्सेक्सने (Sensex) आज 62 हजारांच्या टप्प्याला स्पर्श केला, मात्र तेथून तो घसरला व दिवसअखेर 61,716.05 अंशांवर स्थिरावला. आयआरसीटीसीने (IRCTC) आज एक लाखकोटी रुपये भांडवली बाजारमूल्याचा टप्पा गाठला. सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 49.54 अंशांची घट झाली. तर 58.30 टक्के घसरलेला निफ्टी (Nifty) आज व्यवहार संपताना 18,418.75 अंशांवर बंद झाला. आज धातूनिर्मिती, एफएमसीजी, बांधकाम या क्षेत्रांच्या शेअरचे भाव घसरले.

आज टक्केवारीच्या हिशोबात आयटीसी सर्वात जास्त म्हणजे सव्वासहा टक्के (16 रुपये) घसरून 246 रुपयांवर स्थिरावला. 107 रुपये घसरलेला हिंदुस्थान युनिलीव्हर 2,546 रुपयांवर आला, तर 222 रुपयांनी घसरलेला अल्ट्राटेकने देखील आज 7,174 रुपयांचा भाव दाखवला. टायटन ( बंद भाव 2,486 रु.), टाटा स्टील (1,367), इंडसइंड (1,194), एशियन पेंट (3,184), बजाज फायनान्स (7,730), डॉ. रेड्डीज लॅब (4,800), सनफार्मा (827), टीसीएस (3,634) या शेअरचे भाव आज घसरले. दुसरीकडे आजच्या नफावसुलीतही चांगल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. टेक महिंद्र (1,539), लार्सन अँड टुब्रो (1,846), इन्फोसिस (1,821), एचडीएफसी बँक (1,688), कोटक बँक (2,035), बजाज फिनसर्व्ह (19,054), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,731) यांचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,510 रु.

चांदी - 64,200 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT