share market sakal media
अर्थविश्व

दुसऱ्या दिवशीही नफावसुली; सेन्सेक्स 456 अंश घसरला

कृष्ण जोशी

मुंबई : उच्चांकी स्तरावर पोहोचलेले भारतीय शेअरबाजार (Indian Share Market) निर्देशांक आज सलग दुसऱ्या दिवशीही नफावसुलीमुळे घसरले. सेन्सेक्स (Sensex) 456.09 अंश तर निफ्टी (Nifty) 152.15 अंशांनी कमी झाला. आज बँकांचे शेअर्सच (bank shares) काहीसे तेजीत होते, धातूनिर्मिती, एफएमसीजी, औषधनिर्मिती (medicine development) आदी अन्य सर्व क्षेत्रे घट दाखवीत बंद झाली. आज दिवसअखेर सेन्सेक्स 61,259.96 अंशांवर तर निफ्टी 18,266.60 अंशांवर स्थिरावला.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 शेअरमधील फक्त सात शेअर वाढले, त्यात एअरटेल (बंद भाव 708 रु.), स्टेट बँक (499 रु.), इंडसइंड बँक (1,201 रु.), अॅक्सीस बँक (804), बजाज फायनान्स (7,761), आयटीसी (246) व एचसीएल टेक (1,232) यांचा समावेश होता. सेन्सेक्समधील अन्य 23 शेअरचे भाव घसरले.

टायटन 73 रुपयांनी घसरून 2,412 रुपयांवर तर हिंदुस्थान युनिलीव्हर 67 रुपयांनी घसरून 2,479 रुपयांवर आला. 455 रुपयांनी घसरलेला बजाज फिनसर्व्ह 18,598 रुपयांवर आला. त्याखेरीज लार्सन अँड टुब्रो (1,807), महिंद्र आणि महिंद्र (899), टाटा स्टील (1,342), बजाज ऑटो (3,848), सनफार्मा (814), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,699) व इन्फोसीस (1,800) या शेअरचे भावही आज घसरले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,490 रु.

चांदी - 64,600 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT