Share Market Sakal
अर्थविश्व

Market Crash : गुंतवणूकदारांनी SIP न थांबवण्याच तज्ज्ञांचा सल्ला

भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्री दिसून आली.

शिल्पा गुजर

भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्री दिसून आली.

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारपेठेत चांगलाच दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात (Share Market) सलग सहाव्या दिवशी विक्री दिसून आली. कमकुवत जागतिक संकेत आणि युक्रेनवर रशियाचा हल्ला (Russias Ukraine War) यामुळे भारतीय शेअर बाजारांनी दिवसाची नीचांकी पातळी गाठली.

सेन्सेक्स (Sensex) 2000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी (Nifty) देखील 16400 च्या खाली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशांची भीती वाटत आहे. यामध्ये पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. असेच प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील तर शेअर मार्केट तज्ज्ञ काय सांगत आहेत ऐका, शेअर मार्केट कोसळत असताना तुमचे शेअर्स विक्री करण्यापेक्षा होल्ड करा असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत.

'ही स्थिती फार काळ राहणार नाही'

सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी हसत राहिले पाहिजे, असे बाजार तज्ज्ञ आणि हेलिओस इंडियाचे सीईओ दिनशॉ इराणी म्हणाले. तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती फार काळ अशी राहणार नाही. गुंतवणूकदारांनी सध्या थांबावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

घसरणीनंतरही शेअर बाजारात चांगला परतावा मिळणे शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते, घसरणीमुळे घाबरण्याची गरज नाही. महागाईवरही युद्धाचा परिणाम होऊ शकतो असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एसआयपी थांबवू नये

बाजारातील कमकुवतपणा हळू हळू कमी होत चालल्याचे बाजार तज्ज्ञ व्हीके शर्मा यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजारातील कमजोरी 2-3 सत्रांत संपेल. अनेकदा असे दिसून आले आहे की, शेअर मार्केट कोसळताच सामान्य गुंतवणूकदार आपले शेअर्स विकतात, पण गुतवणूकदारांनी असे करू नये असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञ देत आहेत.

तुम्ही SIP अजिबात थांबवू नका आणि शेअर्स विकू नका असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञ देत आहेत. त्याचबरोबर एक शेअर विकून दुसरे शेअर्स घेण्याची गरज नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही निफ्टी ईटीएफमध्ये पैसे गुंतवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT