Inflation TV fridge electronic devices Prices on Rise  sakal
अर्थविश्व

टीव्ही, फ्रीज महागणार?

इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किमती जूनच्या सुरुवातीस वधारणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजसारख्या घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती मेच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाच टक्के महागण्याची चिन्हे आहेत. कारण उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढला असून आता ते त्याचा बोझा ग्राहकांवर टाकत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचे हे परिणाम असून उत्पादकांना वस्तूंसाठीचा कच्चा माल आयात करणे आता अधिक महागले आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल व उपकरणे बऱ्याच अंशी परदेशातून आयात करावी लागतात. डॉलरच्या तुलनेत रुपया महागल्याने आता या वस्तू उत्पादकांना आयात करणेही महागले आहे. याशिवाय चीनमध्ये कोरोनाच्या प्रकोपामुळे सागरी मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उपकरणांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक वस्तूंचा बाजारातील पुरवठाही घटला आहे.

ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरण उत्पादक संघाने (सिएमा) माहिती दिली की, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याने उद्योगांसाठी अडचणी वाढल्या आहेत. सिएमाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंजा यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ कायम आहे, त्यात आता अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. त्यामुळे उत्पादकांचा नफा कमी होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी घसरून ७७.४० रुपये प्रतिडॉलर झाला होता.

खर्च कपातीचा प्रयत्न

पॅनेसॉनिक इंडिया आणि दक्षिण आशियाचे सीईओ मनीष शर्मा म्हणाले की, कंपन्या उत्पादन खर्चात कपातीच्या प्रयत्नात आहेत. कच्चा माल महागल्याने ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ४ ते ५ टक्के अधिक किंमत मोजावी लागेल. ज्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, मॅक्रोव्हेवचा समावेश आहे.

चीनमधील लॉकडाऊनचा फटका

हायर अप्लायन्स इंडियाचे अध्यक्ष सतीश एन. एस. म्हणाले की, चीनच्या शांघायमध्ये लॉकडाऊन असल्याने उपकरणांच्या पुरवठ्यात बाधा येत आहे. ज्याचा परिणाम जूनपासून दिसण्यास सुरू होईल. ते म्हणाले, एसी आणि फ्लॅट पॅनेलचे टीव्ही यांच्या किमतीवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल, तर फ्रीजच्या किमतीवर त्या तुलनेत कमी परिणाम दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT