अर्थविश्व

मुंबईत "इन्स्पायर' परिषदेचे आयोजन 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कल्पक संशोधनाच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जेच्या विकासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (ईईएसएल) मुंबईत इंटरनॅशनल सिंपोझिअम टु प्रमोट इनोव्हेशन अँड रिसर्च इन एनर्जी एफिशिअन्सी (इन्स्पायर) या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मुंबईत ही परिषद पार पडेल.

यंदाचे परिषदेचे चौथे वर्ष असून जागतिक बॅंक (डब्ल्यूबी), आशियाई विकास बॅंक (एडीबी), जागतिक संसाधन संस्था, भारत (डब्ल्यूआरआय इंडिया), युनायटेड स्टेट्‌स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड) आणि इस्रायल सरकार या परिषदेचे सह-यजमानपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत ऊर्जेचा किफायतशीर वापर करणारे कल्पक भविष्यवेधी तंत्रज्ञान व त्याची अंमलबजावणी, धोरण आणि अर्थपुरवठा व्यवस्था यावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. या परिषदेचे उद्‌घाटन ऊर्जा खात्याचे सचिव संजीव नंदन सहाय करणार असून इस्रायलचे वाणिज्य दूत याकाओव्ह फिंकलस्टीन यांचे प्रमुख मार्गदर्शनपर भाषण असेल. 

जगभरातील सरकारी उच्चपदस्थ; तसेच उद्योग-व्यापार क्षेत्रातले मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जागतिक पातळीवरील ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम घडामोडी आणि यशोगाथांची देवाण-घेवाण या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. भारतातील किफायतशीर ऊर्जा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींवरही भर दिला जाणार आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून आणलेली प्रोत्साहनपर धोरणे, उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त पद्धती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतून होणारे लाभ यावर या परिषदेत ऊहापोह होणार आहे. स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेचा किफायतशीर वापर यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी तज्ज्ञ, अभ्यासक, उद्योग आणि धोरणकर्ते यांना सहभागी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले. "इन्स्पायर'च्या माध्यमातून ही बाब साध्य होईल आणि विविध क्षेत्रातील भागधारक एकत्र येऊन एक जोमदार भागिदारी आकाराला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT