PPF Sakal
अर्थविश्व

'या' सरकारी योजनेत 12,500 रुपये गुंतवा; मिळावा 65 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज

सरकारी योजनांमध्ये थोडीशी गुंतवणूक करून चांगले पैसे कमावता येतात. ज्यामध्ये कोणताही धोका नसतो.

सकाळ डिजिटल टीम

अनेक सरकारी योजना गुंतवणूकदारांना भरघोस व्याज देतात. या योजनांमध्ये करमुक्त व्यवहारां सोबतच इतर फायदेही दिले जातात. सरकारी योजनांमध्ये थोडीशी गुंतवणूक करून चांगले पैसे कमावता येतात. ज्यामध्ये कोणताही धोका नसतो. सरकारच्या अशाच एका योजनेमध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये मिळवता येऊ जाऊ शकतात.

1 कोटी रुपये जमा करण्यासाठी, तुम्हाला 25 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल, ज्यावर तुम्हाला 65 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. त्यात दरवर्षी किंवा महिन्याला गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज मिळेल. ही योजना देखील करमुक्त आहे आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवण्याचा पर्याय देखील देते.

हेही वाचा : किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

ही योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आहे, ज्याचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे आणि किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकतात. चक्रवाढीचा लाभ देखील वार्षिक आधारावर उपलब्ध आहे. सरकार दर तिमाहीचा आढावा घेऊन या योजनेतील व्याज वाढवते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. PPF चा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

गुंतवणूकदाराने या योजनेत दरमहा रु. 12,500 गुंतवले आणि 12 महिन्यांत वार्षिक 1.50 लाख रु होतात. तर PPF कॅल्क्युलेटर नुसार, 15 वर्षात एकूण 40.68 लाख रु गुंतवणूक होईल, ज्यामध्ये एकूण गुंतवणूक रु. 22.50 लाख आणि व्याजाची रक्कम 18.18 लाख रुपये असेल.

ही योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवली आणि 5 वर्षांसाठी एकदा गुंतवणूक केली तर एकूण मॅच्युरिटी 25 वर्षे होईल. त्यानुसार 1 कोटी 03 लाख 08 हजार 15 रुपये पीपीएफ खात्यात जमा होतील. 25 वर्षात गुंतवणुकीची रक्कम फक्त 37.50 लाख रुपये असेल, तर मिळणारे व्याज 65 लाख 58 हजार रुपये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT